
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील हे शनिवारपासून मुंबईतल्या आझाद मैदानात उपोषण करणार आहेत. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, या मागणीवर ते ठाम आहेत. शुक्रवारी जरांगे पाटील हे पुणे जिल्ह्यात होते.
पुण्यातल्या कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांनी जरांगे पाटलांच्या सभेत भाषण केलं. त्यांचं हे भाषण चांगलंच गाजत आहे. या अगोदर गावच्या लोकांनी मुंबईकरांना सांभाळलं, जपलं.. पण आता गावचे लोक मुंबईत जात आहेत. त्यामुळे त्यांची जबाबदारी मुंबईकरांची आहे, त्यांची काळजी घ्या, असं आवाहन माजी सरपंच नवले यांनी केलं.