

Manoj Jarange Patil
Esakal
मुंबईत मराठा आंदोलनासाठी जायचं ठरल्याचं सांगत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला एकजूट दाखवण्याचं आवाहन केलंय. मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यानं मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. अंतरवाली सराटीत आंदोलनाच्या नियोजनाबाबत बैठकीनंतर बोलताना जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला लेकरा बाळांसाठी सहभागी व्हा असं आवाहन केलं. तसंच मराठा समाजानं आता ठरवायचंय की नेता मोठा करायचा की लेकरा बाळांना असंही जरांगे पाटील म्हणाले.