Jarange Patil announces Agitation In Mumbai : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. मुलीची परीक्षा असल्याने देवेंद्र फडणवीस ५०० मीटरवर राहायला जात नाही. मग त्यांना मराठ्यांच्या मुलांबाबत ही माया येत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.