मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

अंतरवाली सराटीत मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं होतं. सरकारच्या शिष्टाईनंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं आहे.
मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी
Updated on

मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील भर ऊन्हात उपोषणाला बसले होते. हे उपोषण शनिवारी रात्री उशिरा स्थगित करण्यात आलं. सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर जरांगे पाटील यांनी सविस्तर चर्चेनंतर उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. तसंच शिंदे समितीला एका वर्षाची मुदतवाढ देण्याची मागणीही मान्य करण्यात आलीय. Manoj Jarange Ends Hunger Strike After Government Assurances

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com