

Manoj Jarange Patil Health
ESakal
Manoj Jarange Patil Health Update: मागील दहा दिवसांपासून जालन्याच्या अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. मागण्या पूर्ण करण्यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला १२ तारखेपर्यंतचा वेळ दिला असून त्या दिवशी सर्व मराठ्यांनी अंतरवाली सराटीत यावं, असं आवाहन देखील केलं आहे. मात्र गेल्या दहा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांची प्रकृती खालावत असल्याची माहिती समोर आली आहे.