
लातूर: ‘‘मराठा समाजाच्या भावना आंदोलक मनोज जरांगे यांनी मांडल्या आहेत. त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या कानावर घालणार आहे. चर्चेतूनच सगळे तोडगे निघतातात, यावर विश्वास आहे. याच पद्धतीने मराठा समाजाचाही प्रश्न चर्चेतून सुटेल, याची खात्री आहे,’’ असे प्रतिपादन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
सरनाईक-जरांगे यांच्यात आज येथे सुमारे अर्धा तास चर्चा झाली.