वडीगोद्री (जि. जालना) - ‘न्यायालयाने काय निर्णय दिला, हे बघितलेले नाही. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करता येते. आम्ही कायदा, नियमाप्रमाणे न्यायालयात परवानगी मागितली आहे..आम्हाला परवानगी नक्की मिळणार. खारघर (मुंबई) येथे परवानगी आहे मग आझाद मैदानावर का नाही? हा सरकारचा डाव किंवा खेळी आहे. परवानगी मिळाली नाही तरी उद्या (ता. २७) आम्ही अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथून मुंबईला निघणार आहोत,’ असे मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे- पाटील यांनी सांगितले..अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे म्हणाले, ‘सरकार हे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी असते. पण हे सरकार इंग्रजांप्रमाणे वागत आहे. आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलनही करू देत नाही. आम्ही शांततेत मुंबईला जात आहोत.आमचे वकील न्यायालयात बाजू मांडणार आहेत. न्याय देवता आम्हाला नक्की न्याय देईल. नियमांचे, न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करून आम्ही मुंबईत आझाद मैदानावर उपोषण करणार आहोत. त्यासाठी अंतरवाली सराटीतून उद्या (ता. २७) सकाळी दहाच्या सुमारास निघणार आहोत.’.दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) राजेंद्र साबळे मंगळवारी अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले होते. जरांगे व साबळे यांच्यात माध्यमांसमोरच चर्चा झाली. पत्रकारांशी संवाद साधताना साबळे म्हणाले, ‘जरांगे यांच्याकडून त्यांच्या मोर्चाचा मार्ग जाणून घेण्यासाठी आलो आहे.यासंदर्भात त्यांच्या काही अडचणी आहेत का, हे जाणून घेण्याचा या भेटीमागचा उद्देश आहे. यापूर्वी त्यांच्याशी फोनवर चर्चा झाली होती.’ ‘आम्हाला आझाद मैदानावर जाण्यासाठी कोणताही एक मार्ग द्या. तसे केल्यास मुंबईतील गणेश भक्तांना कोणताही त्रास होणार नाही,’ असे जरांगे यांनी सांगितले..आंदोलकांची तयारीअन्य गावांतील आंदोलक वाहनांद्वारे अंतरवाली सराटीत दाखल होऊ लागले आहेत. त्यांनी जीवनावश्यक वस्तू सोबत घेतल्या आहेत. मार्गावरील गावातील ग्रामस्थांनी जेवणाची व्यवस्था केली आहे. अंतरवाली सराटी, वडीगोद्री येथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे..आझाद मैदानावर आंदोलनास मनाई; न्यायालयाकडून खारघर येथील जागेचा पर्याय‘मनोज जरांगे यांना परवानगीशिवाय आझाद मैदान येथे आंदोलन करता येणार नाही,’ असे मंगळवारी उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. ‘गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊ शकते तसेच कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो, हे टाळण्यासाठी मुंबईऐवजी खारघर (नवी मुंबई) येथील जागेचा पर्याय द्यावा,’ असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले..तसेच, जरांगेंनी आंदोलनासाठी परवानगी मिळविण्यासाठी संबंधित यंत्रणांकडे रीतसर अर्ज करावा त्यानंतर परवानगी मिळाल्यास त्यांनी शांततेत आंदोलन करावे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ऐन गणेशोत्सवात जरांगे यांनी मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे त्यांना आंदोलनाची परवानगी देऊ नये, या मागणीसाठी ‘अॅमी फाउंडेशन’तर्फे जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.या याचिकेवर मुख्य न्या. आलोक आराधे आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. जरांगे यांनी आंदोलनासाठी परवानगी घेतली नसल्याची माहिती महाधिवक्त्यांनी न्यायालयास दिली. न्यायालयाने त्याची दखल घेऊन जरांगे यांना प्रतिवादी करण्याची सूचना केली..न्यायालय म्हणाले,सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित काळासाठी आंदोलन अशक्यपरवानगीशिवाय जरांगे यांना आंदोलन करता येणार नाहीजरांगे यांनी आंदोलन केल्यास नागरिकांचीच गैरसोय होईलपर्यायी स्थळ म्हणून सरकारने खारघरचा विचार करावा.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.