
Maratha Reservation: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सरकारकडे पाच ते सहा मागण्या केल्या असून त्या २८ तारखेपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर २९ तारखेपासून मुंबईत आंदोलन होणार असून येताना एकतर विजयाचा रथ येईल किंवा अंत्ययात्रेचा; असा निर्धार जरांगेंनी बोलून दाखवला, ते बुधवारी माध्यमांशी बोलत होते.