Prakash Ambedkar on Jarange: जरांगे यांच्या आंदोलनाचे केंद्र मुंबईऐवजी दिल्लीकडे - ॲड. प्रकाश आंबेडकरांचा दावा

Prakash Ambedkar Claims Jarange Protest Centre Shifted to Delhi: आंदोलनाचे केंद्र मुंबई-ठाण्याऐवजी दिल्लीकडे सरकल्याचे सांगत त्यांनी गरीब मराठ्यांच्या प्रश्नापेक्षा सत्तेच्या राजकारणाला अधिक महत्त्व दिले जात असल्याची टीका केली.
Prakash Ambedkar on Jarange

Prakash Ambedkar on Jarange

esakal

Updated on

पुणे: "मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची दिशा आणि आंदोलनाचे केंद्र बदलले असून, पूर्वी मुंबई आणि ठाण्याभोवती असलेले आंदोलनाचे केंद्र आता दिल्लीकडे सरकले आहे. गरीब मराठ्यांच्या प्रश्नापेक्षा सत्तेच्या राजकारणातील पटावरचा खेळ या आंदोलनात अधिक असल्याचे दिसत आहे," असा दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केला. बेरोजगार आणि त्रस्त तरुण मराठा वर्गाने कोणाच्या नादी लागू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com