Manoj Jarange Demand: मनोज जरांगेंच्या सरकारकडे ७ मागण्या, पूर्ण न झाल्यास...; राज्य सरकार काय भूमिका घेणार?

मनोज जरांगे म्हणाले आझाद मैदानाकडे निघालो तर माघारी फिरणार नाही. आझाद मैदानाबाबत उद्या दुपारी १२ वाजेपर्यंतचा वेळ त्यांनी सरकारला आहे. त्यामुळे आता राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकारची भूमिका आता महत्वाची ठरणार आहे. नाहीतर मनोज जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत.
Manoj Jarange Demand
Manoj Jarange Demand

Manoj Jarange Demand: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज वाशी येथील छत्रपती शिवाजी चौकात जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी सरकारकडे तीन मागण्या केल्या. त्या मागण्यासंदर्भात आज रात्रीत अध्यादेश द्यावा, नाहीत आदोलन सुरु राहणार. अध्यादेश दिला तर मुंबईत विजयाचा गुलाल घेऊन येणार असे मनोज जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे म्हणाले, मी आरक्षणासाठी इथपर्यंत आलो आहे. अंतरवाली सराटीत असताना देखील आमची हीच मागणी होती. यावेळी जरांगे म्हणाले, मला जेवढे वतरीत केले त्या ३७ लाख प्रमाणपत्रांचा डाटा पाहिजे. सगे सोयऱ्यांबाबत अध्यादेश पाहिजे. गुन्हे मागे घेण्याबाबत पत्र पाहिजे. मोफत शिक्षण आणि राखीव जागा ठेवण्याबाबत निर्णय पाहिजे, अशा मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी केल्या आहेत. (Latest Marathi News)

मनोज जरांगे म्हणाले आझाद मैदानाकडे निघालो तर माघारी फिरणार नाही. आझाद मैदानाबाबत उद्या दुपारी १२ वाजेपर्यंतचा वेळ त्यांनी सरकारला आहे. त्यामुळे आता राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकारची भूमिका आता महत्वाची ठरणार आहे. नाहीतर मनोज जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत.  

Manoj Jarange Demand
Maratha Reservation: महाराष्ट्रातील मेगाभरतीला ब्रेक लागणार? आरक्षणमिळेपर्यंत भरती करू नका, जरांगे पाटील यांची मागणी

मनोज जरांगे यांच्या मागण्या कोणत्या?

  • नोंद सापडणाऱ्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्यावे

  • शपथपत्र घेऊनच सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या

  • कोर्टात आरक्षण मिळेतपर्यंत मुला-मुलींना १०० टक्के शिक्षण मोफत करा

  • जिल्हास्तरावर वसतिगृह करा

  • आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करु नका, भरती केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा

  • आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या.

  • SEBC अंतर्गत २०१४ च्या नियुक्त्या त्वरित घ्या

  • वर्ग १ व  २ आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या द्या.

  • रात्रीपर्यंत शासन निर्णयाचे अध्यादेश द्या, मैदानात जात नाही (Maratha Reservation News in Marathi)

Manoj Jarange Demand
Jarange Patil in Mumbai: तोडगा नाहीच ! जरांगे पाटलांनी दिली आज रात्रीची मुदत.. आझाद मैदानाकडे उद्या करणार कूच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com