esakal | काळजी घ्या! पुढील 3 तास राज्यात विजांसह मुसळधार पाऊस I Rain Update
sakal

बोलून बातमी शोधा

Rain News

याचा प्रभाव उत्तर कोकणावरही होणार असून पुढील तीन तास राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

काळजी घ्या! पुढील 3 तास राज्यात विजांसह मुसळधार पाऊस

sakal_logo
By
टीम ई सकाळ

रत्नागिरी - 'गुलाब' नंतर आता 'शाहीन' (shaheen cyclone update) चक्रीवादळ अरबी समुद्रात गुरुवारपासून दाखल झाले आहे. दरम्यान उत्तर अरबी समुद्राच्या मध्यवर्ती भागांवर धडकलेले हे चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकले आहे. याचा प्रभाव उत्तर कोकणावरही होणार असून पुढील तीन तास राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची (heavy rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. (mansoon update)

हेही वाचा: 'मुख्यमंत्री साहेब, शाब्दिक धीराची गरज नाही तर...' - सदाभाऊ खोत

दरम्यान, यामध्ये पश्चिम महाराष्टातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार आहे. याशिवाय पुणे, नगर, नाशिक, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, वर्धा, वाशिम असा अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून या प्रदेशातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (heavy rain)

हेही वाचा: 'भाजपाने ठरवलंयच की...' हसन मुश्रीफांचा हल्लाबोल

गेले काही दिवस सुरु असलेल्या गुलाब चक्रीवादळामुळ पावसाने मध्य महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. परिणामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एकाच आठवड्यात दोन चक्रीवादळ तयार झाली असल्याने शेतकरी चिंतीत झाला आहे. 'शाहीन'मुळे गुरुवारी सकाळपर्यंत उत्तर कोकण, गुजरात, कच्छ आणि सौराष्ट्रला रेड अलर्ट जारी करण्यात आला असून काही देशात काही ठिकाणी येत्या २४ तासांत या मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

loading image
go to top