esakal | 'भाजपाने ठरवलंयच की...' हसन मुश्रीफांचा हल्लाबोल I Hasan Mushrif
sakal

बोलून बातमी शोधा

hasan mushrif

माझ्या जावयावर आरोप करुन त्यांना बदनाम करण्यात येत आहे. या नवीन कारस्थानांचा मी निषेध करतो

'भाजपाने ठरवलंयच की...' हसन मुश्रीफांचा हल्लाबोल

sakal_logo
By
सदानंद पाटील

कोल्हापूर - भाजपाने (BJP) मला टार्गेट करायचं ठरवलं आहे. सातत्याने मी त्यांच्या विरोधात आवाज उठवतो त्यामुळे टार्गेट केलं जातंय. आता माझ्या कुटुंबीयांनाही बदनाम करायचं त्यांचं कारस्थान आहे. माझ्या जावयावर आरोप करुन त्यांना बदनाम करण्यात येत आहे. या नवीन कारस्थानांचा मी निषेध करतो, असा हल्लाबोल ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan mushrif) यांनी केला आहे. ते आज कोल्हापुरात बोलत होते. (Kolhapur News)

यावेळी बोलताना त्यांनी आरोग्य विभाग परीक्षांसदर्भात भाष्य केले. ते म्हणाले, आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी आयटी कंपनी ग्रामविकास विभागाने नाही, तर आरोग्य विभागाने निवडली आहे. यासाठीच्या वादानंतर मंत्रिमंडळ बैठकीत फेर तपासणीचा निर्णय घेतला गेला आहे.

हेही वाचा: शेतकऱ्यांना दिलासा; विम्याचे 51 कोटी लवकरच खात्यावर जमा होणार

पुढे ते म्हणाले, राजू शेट्टी (Raju Shetti) यांना मी संयम राखण्याची विनंती केली आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतीही आता बेचिराख झाली आहे. तेथील अनेक शेतरकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जोपर्यंत पंचनामे पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत सरकार काहीही करू शकणार नाही. यासाठी सर्वांनीच थोडा संयम राखला पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

loading image
go to top