आरटीई २५ टक्क्यांतर्गत प्रवेशासाठी आले तब्बल एवढे अर्ज

आरटीई २५ टक्क्यांतर्गत प्रवेशासाठी आले तब्बल एवढे अर्ज
Updated on

पुणे - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता राज्यभरातून आतापर्यंत तब्बल दोन लाख आठ हजार ५६७ अर्ज आले आहेत. राज्यातील नऊ हजार ४३२ शाळांमधील ९६ हजार ६८४ जागांकरिता ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. प्रवेशासाठी रिक्त असणाऱ्या एकूण रिक्त जागांच्या तुलनेत आलेल्या अर्जाची संख्या दोनशे टक्क्यांहुन अधिक आहेत. त्यामुळे सोडत पद्धतीने (लॉटरी) कोणाला प्रवेश मिळणार! याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरटीईनुसार आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. या जागांकरिता ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठीची प्रवेश प्रक्रिया तीन मार्चपासून सुरू झाली. प्राथमिक शिक्षण विभागाने ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर पालकांना ‘ओटीपी’ येण्यात तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे काही दिवसांपूर्वी ऑनलाइन अर्ज भरण्याची ही प्रक्रिया थांबविण्यात आली होती. अर्ज भरण्याची सुविधा मागील आठवड्यापासून पुन्हा सुरू झाली असून अर्ज भरण्यासाठी ३० मार्चपर्यंत मुदतवाढ ही देण्यात आली आहे.

त्यामुळे या अंतर्गत प्रवेश अर्ज भरण्याला गती मिळाली. शनिवारी सायंकाळपर्यंत राज्यातील दोन लाख आठ हजार ५६७ विद्यार्थ्यांचे ऑनलाइन प्रवेश अर्ज भरले गेले. यात पुणे जिल्ह्यातून ५२ हजार ४८७ असे सर्वाधिक अर्ज आले आहेत. 

आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी जिल्हानिहाय आलेल्या अर्जाची संख्या : 
जिल्हा : शाळांची संख्या : प्रवेशासाठी रिक्त जागा : आलेले प्रवेश अर्ज 

पुणे : ९८५ : १४,७७३ : ५२,४८७ 
नागपूर : ६८० : ५,७२९ : २३,३६५ 
ठाणे : ६७७ : १२,०७४ : १७,७४९ 
नाशिक : ४५० : ४,५४४ : १२,४२५ 
औरंगाबाद : ६०३ : ३,६२५ : ११,१३७ 
नगर : ४०२ : ३,०१३ : ४,३७३

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com