देशभरात दररोज होतात कोरोनाच्या एवढ्या चाचण्या; वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 July 2020

देशातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकाधिक चाचण्या करण्यावर भर दिला जात आहे. आत्तापर्यंत देशभरात एक कोटीहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे (आयसीएमआर) सांगण्यात आले.

मुंबई - देशातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकाधिक चाचण्या करण्यावर भर दिला जात आहे. आत्तापर्यंत देशभरात एक कोटीहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे (आयसीएमआर) सांगण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशातील विविध राज्यांत ५ जुलैपर्यंत १ कोटी ८० लाख ५९६ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. सोमवारपर्यंत त्यातील १ कोटी ४,१०१ नमुन्यांची चाचणी करण्यात आल्याची माहिती ‘आयसीएमआर’मधील संशोधक तसेच माध्यम समन्वयक डॉ. लोकेश शर्मा यांनी दिली. सध्या देशभरात एक हजार १०५ प्रयोगशाळा आहेत. त्यात ७८८ सरकारी, तर ३१७ खासगी प्रयोगशाळांचा समावेश आहे. या प्रयोगशाळांची दैनंदिन चाचण्या करण्याची क्षमताही वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे डॉ. शर्मा यांनी सांगितले. मागील १५ दिवसांत देशात दररोज साधारणत: २ लाखांहून अधिक चाचण्या केल्या जात होत्या. अशाप्रकारे १ जुलैपर्यंत ९० लाख चाचण्या करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनो, आता घरबसल्या शिका; वाचा ही महत्त्वाची बातमी!

शर्मा म्हणाले की, २५ मे पर्यंत दिवसाला केवळ दीड लाख चाचण्या होत होत्या. प्रयोगशाळांसह चाचण्यांची क्षमता वाढवून आता दिवसाला तीन लाख चाचण्या केल्या जात आहेत.

‘गोलर’ रुग्णसेवेत दाखल
मुंबई - मुंबईतील वरळीच्या पोद्दार रुग्णालयात रोबो ‘गोलर’ कामावर दाखल झाला आहे. अन्न, पाणी आणि औषधे रुग्णांपर्यंत पोचवण्याचे काम गोलर करत आहे. यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींसोबत संपर्क कमी होणार असल्याने जोखीम कमी होणार आहे.मुख्यमंत्री कार्यालयाकडून मंगळवारी (ता.७) गोलरच्या सेवेचा पहिला व्हिडिओ जारी करण्यात आला. या रोबोचा फायदा होत आहे. सध्या औषध, नाष्टा, जेवण, पाणी हे सर्व देण्यासाठी या रोबोचा उपयोग होत आहे, अशी माहिती रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाचे सहाय्‍यक प्राध्यापक डॉ. प्रज्ञा कापसे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: many corona tests every day across the country