Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील करणार मराठवाडा दौरा, तारखा पण ठरल्या!

Manoj Jarange Patil : पोलीस भरतीत मुदत वाढ देणार होते तेही मिळत नाही, या कडे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष द्यावे असे जरांगे यांनी सांगितले.
 मनोज जरांगे करणार मराठवाडा दौरा, तारखा पण ठरल्या!
Marathwada:sakal

VadiGodri| शासनाने निवडणूक डोळ्या समोर ठेवुन मते जोडण्याचे काम चालू केल आहे हे करत असतांना मराठा समाजाच्या मागणी कडे दुर्लक्ष करुण समाज हातातुन जाऊ देऊ नका, समाजाचा रोष शासनाने घेऊ नये असे मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी बोलतांना शुक्रवार ता.5 रोजी सांगीतले .

मराठा आरक्षण, आमच्या व्याख्या प्रमाणे सगे सोयरे कायद्यांची अंमलबजावणी करणे, हैद्राबाद सह विविध संस्थाचे गॅजेट स्विकारणे, जात प्रमाणपत्र वाटप चालू करणे,गुन्हे वापस घेणे,मुलीना मोफत शिक्षण लागु करणे,मुलींची फी माफ करणे व समाजाला त्रास देणे थांबवणे आदी मागणीसाठी मनोज जरांगे मराठवाड्यात (आजपासून) शनिवार ता.6 रोजी मराठा आरक्षण जनजागृती शांतता राअलीची सुरवात हिंगोली जिल्ह्यापासून करत आहे.

 मनोज जरांगे करणार मराठवाडा दौरा, तारखा पण ठरल्या!
Marathwada Crime: गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक! डबलबोरचे काडतुसही केले जप्त

या वेळी बोलतांना मनोज जरांगे यांनी सांगितले की ,आम्ही शांततेत या राअलीचे आयोजन करत आहे, मंत्री शंभुराजे देसाई ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांच्यावर आमचा विश्वास आहे त्यांना या करीता वेळ वाढवुन दिला ते नक्की आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतील, अध्यादेश काढतील असी खात्री आहे. जनजागृती राअलीला गालबोट लागणार नाही , शासनाने या बाबत लक्ष ठेवावे गालबोट लागले तर त्याची जबाबदारी शासनाची असणार आहे, आम्ही जातीय तेढ निर्माण करत नाही,ओबीसी आंदोलन बाबत जरांगे यांना पत्रकाराने विचारलं असता त्यांनी सांगितले की, ओबीसी व आमच्यात वाद नाही संविधानाने प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे दोन्ही समाजाने शांतता पाळवी असे जरांगे यांनी सांगितले.उपमुख्यमंत्री फडणवीस सांगतात आम्ही आरक्षण दिले, सारथी संस्थेला व महामंडळाला निधी दिला ,परंतु याची अंमलबजावणी होत नाही या कडे त्यांनी लक्ष द्यावे, शिक्षणाकरिता प्रवेश प्रक्रिया चालू आहे,शासनाने सांगीतले मुलींना मोफत शिक्षण देणार ते हि मिळत नाही ,फी भरावी लागत आहे,विद्यार्थीना जातीचे दाखले मिळत नाही,10 टक्के आरक्षण दिले तरीही याचा उपयोग सध्या होत नाही, पोलीस भरतीत मुदत वाढ देणार होते तेही मिळत नाही, या कडे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष द्यावे असे जरांगे यांनी सांगितले.

 मनोज जरांगे करणार मराठवाडा दौरा, तारखा पण ठरल्या!
Marathwada Rain: या महत्वाच्या कारणामूळे यंदा मराठवाड्यात पाऊस नाही, वाचा काया आहे तद्यांचे मत!
 मनोज जरांगे करणार मराठवाडा दौरा, तारखा पण ठरल्या!
Marathwada Workers : पाच वर्षांत ६९ कामगारांनी गमावला जीव;मराठवाड्यातील कारखान्यांत अपघात

समाजाने आपल्या न्याय हक्कासाठी सहभागी व्हावे, आषाढी वारी, शेतीचे काम आहे एक दिवस आपण यासाठी द्यावा, ड्रोन फिरत आहे ते कशासाठी फिरत आहे, त्याचा उद्देश काय आहे हे शासनाने बघावे भागातील लोकांचे व आमचे स्नेहाचे संबध आहे, ड्रोन येत आहे म्हणून मी माझा लढा थांबवणार नाही

मनोज जरांगे

आंदोलक ,अंतरवाली सराटी

मजोज जरांगे यांचा दौरा खालील प्रमाणे

शनिवार ता.6 रोजी हिंगोली

रविवार ता.7 रोजी परभणी

सोमवार ता.8 रोजी नांदेड

मंगळवार ता.9 रोजी लातुर

बुधवार ता.10 रोजी धाराशिव

गुरुवार ता.11 रोजी बीड

शुक्रवार ता.12 रोजी जालना

शनिवार ता.13 रोजी छत्रपती संभाजीनगर

 मनोज जरांगे करणार मराठवाडा दौरा, तारखा पण ठरल्या!
Marathwada Food : अस्सल चवीची मराठवाड्याची खाद्यसंस्कृती, नान खलिया ते पिठलं भाकरी..!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com