Maratha Reservation : मला खासदार करा, मी मराठा-धनगर आरक्षणाचा प्रश्‍न दहा मिनिटांत सोडवतो : महादेव जानकर

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळाले पाहिजे.
Maratha Reservation Mahadev Jankar
Maratha Reservation Mahadev Jankaresakal
Updated on
Summary

२००९ मध्ये मी पहिल्यांदा मराठा समाज हा ओबीसी आरक्षणाचा हक्कदार असल्याबाबतचे पुस्तक लिहिले आहे.

कऱ्हाड : राज्यातील मराठा व धनगर समाजाला न्याय मिळाला पाहिजे. आरक्षणाचा प्रश्‍न दिल्लीच्या हातात आहे. तो आमदार म्हणून माझ्या किंवा राज्य शासनाच्या हातात नाही. त्यामुळे मला खासदार म्हणून दिल्लीला पाठवा, दिल्लीत रासपची सत्ता आणा. मी तुमचा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्‍न दहा मिनिटांत सोडवतो, अशी टिपणी माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी येथे केली.

बळीराजा शेतकरी संघटनेने ऊस व दूध दराबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रॅली काढण्यात आली. त्यासाठी जानकर येथे आले होते. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी त्यांनी अभिवादन केले. ते म्हणाले, ‘‘मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळाले पाहिजे. संसदेत ओबीसी आरक्षणाचा कोटा वाढवला पाहिजे. २००९ मध्ये मी पहिल्यांदा मराठा समाज हा ओबीसी आरक्षणाचा हक्कदार असल्याबाबतचे पुस्तक लिहिले आहे.

Maratha Reservation Mahadev Jankar
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या भुजबळांच्या पुतळ्याचं कोल्हापुरात दहन; आंदोलनाला आर्य क्षत्रिय समाजाचा पाठिंबा

मात्र, त्यावेळी मला विरोध झाला. तमिळनाडूत ६३ टक्के आरक्षण आहे, मग महाराष्ट्रात असे का होत नाही. आता जनतेने हुशार झाले पाहिजे. आरक्षणाचा प्रश्न हा मी आमदार म्हणून माझ्या किंवा राज्य शासनाच्या हातात नाही. तो दिल्लीच्या हातात आहे. मला खासदार करून दिल्लीला पाठवा, दिल्लीत रासपचे सरकार आणा, पंजाबराव पाटील यांना रासपचे खासदार करा. मी तुमचा आरक्षणाचा प्रश्न दहा मिनिटांत सोडवून टाकतो, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

Maratha Reservation Mahadev Jankar
Maratha Reservation : कोल्हापुरात आढळल्या तब्बल 5,566 कुणबी नोंदी; मुश्रीफांच्या कागलमध्ये सर्वाधिक, जाणून घ्या किती नोंदी?

मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. शेतकरी व कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी, अशी अपेक्षा जानकर यांनी येथे केली.

Maratha Reservation Mahadev Jankar
काँग्रेसची सत्ता जाणार? कर्नाटकात 15 नोव्हेंबरला मोठा राजकीय भूकंप, शिवकुमार-कुमारस्वामींच्या दाव्याने खळबळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Political Ideology: RSP Chief Mahadev Jankar Reaffirms Commitment to Shahu-Phule-Ambedkar Legacy
Ramrao Vadkute Credits BJP for Welfare Schemes for Dhangar Community in Maharashtra
Simplicity and Memories: Mahadev Jankar Shares Emotional Moments with Shepherds
Model Village: Pimpalgaon Mahadev Emerges as a Hub of Development in Nanded
Marathi News Esakal
www.esakal.com