मंत्रिमंडळात 'एक मराठा, लाख मराठा'; निम्म्यांहून अधिक मंत्री मराठा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 December 2019

ठाकरे सरकारचा आज (सोमवार) पहिल्यांदाच मंत्रिमंडळ विस्तार झाला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकासआघाडी सरकारमधील 36 आमदारांचा आज शपथविधी पार पडला.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मराठा समाजातील आमदारांचे 50 टक्क्यांहून वर्चस्व असल्याचे स्पष्ट दिसत असून, या सरकारच्या मंत्रिमंडळात तब्बल 23 मंत्री मराठा समाजातील आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ठाकरे सरकारचा आज (सोमवार) पहिल्यांदाच मंत्रिमंडळ विस्तार झाला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकासआघाडी सरकारमधील 36 आमदारांचा आज शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी राजभवनामध्ये झालेल्या भव्य कार्यक्रमात या मंत्र्यांना शपथ दिली. उद्धव ठाकरे यांच्यासह शिवाजी पार्कवर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन आमदारांनी शपथ घेतली होती. त्यानंतर नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन पार पडले. अखेर आज मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळाला. आता तिन्ही पक्षांतील मंत्र्यांची नावे स्पष्ट झाली आहेत.

शरद पवार अजित पवारांना म्हणाले, संधीचं सोनं करा

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात मंत्रिमंडळात मराठा नेत्यांचे वर्चस्व होते. पण, देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात या समाजाचे वर्चस्व कमी झाले होते. पण, आता ठाकरे सरकारच्या काळात मराठा समाजाच्या नेत्यांनी पुन्हा एकदा वर्चस्व दाखविले आहे. मंत्रिमंडळात आज समावेश झालेल्या 36 मंत्र्यांपैकी 23 मंत्री मराठा समाजातील आहेत. त्यानंतर मुस्लिम समाजातील 4, ओबीसी वर्गातील 4, नवबौद्ध समाजातील 3 आणि आदिवासी वर्गातील 1 मंत्र्यांचा समावेश आहे. यंदाच्या मंत्रिमंडळात अवघ्या 3 महिलांचा समावेश आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha community MLAs dominate in Maharashtra government cabinet