esakal | शरद पवार अजित पवारांना म्हणाले, संधीचं सोनं करा; 14 नावे निश्चित
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar, Sharad Pawar

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्षाच्या बैठकीत खातेवाटपासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या तेरा आमदारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.

शरद पवार अजित पवारांना म्हणाले, संधीचं सोनं करा; 14 नावे निश्चित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज (सोमवार) होत असून, त्यापूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. भेटीवेळी शरद पवारांनी मिळालेल्या संधीचं सोनं करा, असा संदेश दिल्याचे अजित पवारांनी साम वाहिनीशी बोलताना सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्षाच्या बैठकीत खातेवाटपासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या तेरा आमदारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्रिपदासाठी पक्षाचे नेते अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सूत्रांकडून कळते. नव्या मंत्रिमंडळात युवा आणि अनुभवी अशा दोन्ही नेत्यांना संधी देण्यात आली आहे.

शिवसेनेचे ठरलं; ग्रामीण भागाला प्राधान्य आणि दर दोन वर्षांनी...

आज मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी शरद पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल यांच्यासाठी खुर्च्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. दुपारी एक वाजता होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी राष्ट्रवादी संभाव्य मंत्री त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेत आहेत.

ठाकरे दरबाराचा आज महा"विस्तार' 

राष्ट्रवादीकडून हे आमदार मंत्रीरदाची शपथ घेण्याची शक्यता
कॅबिनेट
अजित पवार
दिलीप वळसे पाटील
धनंजय मुंडे
अनिल देशमुख
डॉ. राजेंद्र शिंगणे
हसन मुश्रीफ 
जितेंद्र आव्हाड 
नवाब मलिक
बाळासाहेब पाटील 
राजेश टोपे

राज्यमंत्री
प्राजक्त तनपुरे
दत्ता भरणे
अदिती तटकरे
संजय बनसोडे