esakal | उद्धव ठाकरे तुमच्या नेत्यांना आवरा नाहीतर... : मराठा क्रांती मोर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

Maratha Kranti Morcha warns Uddhav Thackeray over Sanjay Raut Statement

उद्धव ठाकरे तुमच्या नेत्यांना आवरा नाहीतर... : मराठा क्रांती मोर्चा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागितल्याने मराठा क्रांती मोर्चाने थेट इशारा देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांना आवरावे. आम्हाला रस्त्यावर उतरायला लावू नका, असे म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मराठा क्रांती मोर्चाचे आबा पाटील यांनी म्हटले आहे, की तुम्ही राजकारणात कोणाचे नाव घेत आहात हे बघा. छत्रपतींच्या घराण्याविषयी चुकीचे वक्तव्य केल्यास खपवून घेणार नाही. नरेंद्र मोदींची शिवाजी महाराजांची तुलना करणाऱ्या जयभगवान गोयलविषयी बोलण्याऐवजी तुम्ही छत्रपतींच्या वंशजांविषयी बोलत आहात. तुम्हाला पुरावे हवे असल्यास साताऱ्यात यावे. उद्धव ठाकरे आम्ही तुमचा सन्मान करतो, पण त्यांच्या घराण्याविषयी बोलत असेल त्याला आम्ही सोडणार नाही. राऊत यांनी जाहीर माफी मागावी.

मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे उद्या पहिल्यांदाच बारामतीत

पुण्यात आज (बुधवार) एका कार्यक्रमात शिवसेनेच्या नावावरून उदयनराजेंनी टीका केल्यानंतर संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचे पुरावे उदयनराजे भोसले यांनी दाखवून द्यावे, असे वक्तव्य केले होते. शिवाजी महाराज हे कोणाच्या कुटुंबाचे नाही तर, अवघ्या राज्याचे दैवत आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, शिवाजी महाराज यांच्या वंशजाबाबत राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचे राजकीय पडसाद जोरदार उमटले आहेत.