मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे उद्या पहिल्यांदाच बारामतीत

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 January 2020

  • बारामतीत कृषिक प्रदर्शनाचे उद्‍घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते

माळेगाव : दूरदृष्टीने शेती करण्याचे वास्तव जाणून घेण्यासाठी व नव्या कृषी संस्कृतीची, कृषी क्रांतीची उज्ज्वल दिशा शोधण्यासाठी शेतकऱ्यांच्या दृष्टीने यंदाचे `कृषिक-२०२०` प्रात्यक्षिकयुक्त कृषी प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचे उद्‍घाटन गुरुवारी (ता. १६) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, दुग्ध व पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, राज्यमंत्री विश्‍वजित कदम, खासदार सुप्रिया सुळे, आंतरराष्ट्रीय धोरणकर्ते (इस्राईलचे सल्लागार दूत) डॅन अलुफ व राज्यातील बहुतांशी विद्यापीठांचे कुलगुरू, शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली.

शिवेंद्रराजेंच्या फेसबुकपेजवरील पवारांचा उल्लेख बदलला

अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी विज्ञान केंद्र, बारामतीमार्फत आयोजित केलेल्या यंदाच्या ‘कृषिक-२०२०` या चारदिवशीय कृषी प्रदर्शनाची तयारी पूर्णत्वाला आली आहे. या प्रदर्शनाचा प्रारंभ गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे, यासंबंधी माहिती देताना ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार पत्रकारांशी बोलत होते.

छपाक चित्रपटाचा परिणाम; उत्तराखंड सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

कृषी क्षेत्रातील बदलत्या धोरणांना चालना देण्यासाठी शास्त्रज्ञ, अधिकारी आणि राज्यकर्ते या निमित्ताने एका व्यासपीठावर येणार आहेत, असे सांगून पवार म्हणाले, चार वर्षांपासून प्रात्यक्षिकांवर आधारित भव्य कृषी प्रदर्शन म्हणून खरेतर `कृषिक`कडे पाहिले जाते. आजच्या शेतीला गरज असलेले नवे व जुने जगभरातील शेतीच्या तंत्रज्ञानाची माहिती या प्रदर्शनात शेतकऱ्यांना घेता येणार आहे. दूरदृष्टीने शेती करण्याचे वास्तव जाणून घेण्यासाठी व नव्या कृषी संस्कृतीची, कृषी क्रांतीची उज्ज्वल दिशा शोधण्यासाठी शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तत्पूर्वी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सय्यद शाकीर अली यांनी प्रदर्शनाची मुख्य वैशिष्ट्ये स्पष्ट केली व आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित झालेली प्रात्यक्षिके यंदाच्या कृषिक प्रदर्शनात शेतकऱ्यांना पहावयास मिळणार असल्याचे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tomorrow Chief Minister inaugurates agricultural exhibition in Baramati