
Maratha Reservation
Sakal
अंकुशनगर : ‘‘शासनाने मराठा समाजासाठी काढलेल्या ‘जीआर’वर नाराज असाल तर महाराष्ट्रात राहू नका, हिमालयात निघून जा’’ अशी टीका मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर केली. ‘जीआर’ला विरोध करुन ते समाजाला आणि सरकारला डाग लावायचे काम करीत आहेत. जोपर्यंत छगन भुजबळ आहेत, तोपर्यंत मराठा आणि ओबीसी एक होऊ देणार नाहीत, ते लढत असतील तर मराठवाड्यातील सगळ्या आमदारांनासुद्धा एका बाजूने यावे लागेल, असेही ते म्हणाले.