
Maratha Reservation
Sakal
नागपूर : लोकशाहीत प्रत्येकाला न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. ओबीसी पदाधिकारी न्यायालयात जात असतील तर तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, सरकारही न्यायालयात ठामपणे आपली बाजू मांडणार आहे, असे मत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. सामाजिक सलोखा टिकवण्यावर भर राहणार आहे. उपसमितीकडून कोणावरही अन्याय होणार नाही असेही त्यांनी सांगितले.