Maratha Reservation : ''तो हल्ला नियोजनबद्ध पद्धतीनेच'', जयदत्त क्षीरसागरांनी उपस्थित केले मुद्दे

Maratha Reservation
Maratha Reservationesakal

बीडः मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बीडमध्ये मोठ्या हिंसाचाराची घटना घडली होती. नेत्यांची कार्यालयं आणि घरं जाळण्याचा दुर्दैवी प्रकार बीडमध्ये घडला होता. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केल्यानंतर बिगरमराठा लोकंदेखील आंदोलनामध्ये असल्याचं स्पष्ट झालं आहे.

३० ऑक्टोबर रोजी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचं कार्यालय आणि घर जाळण्याचा प्रकार बीडमध्ये घडला होता. त्यानंतर शुक्रवारी क्षीरसागरांनी माध्यमांशी संवाद साधून प्रतिक्रिया दिली आहे.

जयदत्त क्षीरसागर बोलताना म्हणाले की, त्या दिवशी मनुष्यहानी झाली नाही अन्यथा बीडच्या इतिहासाला काळीमा फासणारी घटना घडली असती. पोलिस तपास सुरु असून आत्ताच त्याच्यावर भाष्य करणं उचित ठरणार नाही. या प्रकरणात कोण मास्टरमाईंड आहे, ते कळेलच.

Maratha Reservation
Maharashtra Election: राज्यात विधानसभेची रंगीत तालीम सुरु; महाविकास आघाडीविरुद्ध भाजपची टक्कर

क्षीरसागर पुढे म्हणाले की, अशा प्रकारची घटना घडणं म्हणजे सामाजिक सुरक्षेला आव्हान दिल्यासारखं आहे, असे पायंडे पडत असतील तर चिंतेची बाब आहे. प्रशासन आणि सरकारच्या कानावर मी याची माहिती घातली आहे. घटनेची चौकशी कुमावत यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे.

''त्या दिवशी ऑफीस, गाडी, घराच्या समोर असलेल्या पाच ते सहा गाड्या जळण्यात आल्या. ऑफीसमध्ये तीन कर्मचारी होते. त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाला. घरीसुद्धा सगळे कुटुंबिय घरात होते. एवढे सदस्य घरात असताना कोंडून मारण्याचा प्रयत्न आणि दगडफेक करण्यात आली''

Maratha Reservation
Maratha Reservation: जरांगेंनी सरकारला दिलेल्या डेडलाईनमुळं संभ्रम? उदय सामंत म्हणाले...

निजामाच्या काळातसुद्धा असं घडलं नसेल

जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, असा क्रूर प्रकार निजामाच्या आणि ब्रिटिशांच्या काळातसुद्धा घडला नसेल. प्रशासनाने याबाबतीत सखोल तपास करुन मास्टरमाईंड शोधून काढावा. हे सगळं नियोजनबद्ध पद्धतीने होतं, त्यामुळे इंटेलिजन्सना कळायला पाहिजे होतं. आंदोलनामध्ये जी नावं समोर आलेली आहेत, त्यात अनेक जातीची मुलं असून कुणाला भाड्याने आणलं की पैसे देऊन आणलं, याबाबत चौकशी सुरु असल्याचं त्यांनी सप्ष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com