Video : मराठा समन्वयक रमेश केरेंचा आत्महत्येचा प्रयत्न; फेसबुक लाईव्ह करत विष घेतलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramesh Kere

Video : मराठा समन्वयक रमेश केरेंचा आत्महत्येचा प्रयत्न; फेसबुक लाईव्ह करत विष घेतलं

मुंबई : सोशल मीडियावर माझी बदनामी केल्याच्या आरोप करत मराठा समाजाचे समन्वयक रमेश केरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. फेसबुक लाईव्ह करत त्यांनी विष घेतलं आहे. तर या घटनेनंतर त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

(Maratha Reservation Coordinator Ramesh Kere Attempt to Suicide)

"आशा, अक्षर भैया, गौरी मला माफ करा, मी आजवर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत आलोय, पण सोशल मीडियावर माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, मला जाणून बुजून बदनाम केलं जात आहे. हे माझं शेवटचं फेसबुक लाईव्ह असेल, ज्या ज्या लोकांनी क्लीप व्हायरल केली त्या लोकांची चौकशी व्हायला पाहिजे" असं म्हणत त्यांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांनी रूग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियात एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत होती. त्यामध्ये मराठा समन्वयक रमेश केरे यांचा उल्लेख होता. मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी कसे आर्थिक व्यवहार झाले आणि हे आंदोलन संपवण्यासाठी कसा प्रयत्न झाला अशी चर्चा त्यानंतर सुरू झाली. त्यावर रमेश केरे यांनी समाजाची माफी मागत मी असं कोणतंही कृत्य केलं नसल्याचं सांगतिलं पण त्यांच्यावरील आरोप सुरूच राहिले.

काय होते आरोप?

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमध्ये केरे यांनी आर्थिक गैरव्यवहार झाले आणि पैसे घेतल्याचा आरोप होत होता.

टॅग्स :Maharashtra NewsMaratha