
Maratha Reservation
Sakal
बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गत वर्षभरात आत्महत्या करणाऱ्या ३० पैकी २७ कुटुंबीयांना मदतीसाठी प्रत्येकी दहा लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झाला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन कोटी ७० लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसांत संबंधित कुटुंबीयांना मदतीची रक्कम वर्ग करण्यात येईल.