
मराठा आणि कुणबी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेल्या मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य करत सरकारने नुकताच एक जीआर काढला आहे. यानुसार, पुढील दोन दिवसांत कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू होणार आहे. मात्र, या निर्णयावर ओबीसी नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतले असून, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, हा जीआर ओबीसी आणि SC-ST समाजाला डावलण्याचा डाव आहे.