
मराठा आरक्षण हा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक संवेदनशील आणि महत्त्वाचा विषय आहे. मनोज जरांगे पाटील मुंबईत आझाद मैदानाव उपोषणाला बसले आहेत. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मराठे मुंबईत दाखल झाले. यामुळे सरकारवर प्रचंड दबाव निर्माण झाला. मराठा आरक्षणासाठी हे पहिलचं आंदोलन नाही. गेल्या चार दशकांहून अधिक काळ मराठा समाजाने आपल्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. या लेखात आपण मराठा आरक्षणाच्या लढ्याचा इतिहास, त्यातील महत्त्वाचे टप्पे आणि २०२५ पर्यंतच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत.