
मुंबई : ‘‘न्यायालयाच्या निर्णयामुळे ‘सरसकट’ हा शब्द वापरण्यास अडचण येत असेल, तर सरकारने तो शब्द काढून २०१२ च्या कायद्यानुसार ‘कुणबी’ ही मराठाची पोटजात आहे, असा शासन आदेश काढून आरक्षण द्यावे,’’ अशी आग्रही मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज केली. त्यांनी न्या. संदीप शिंदे समितीचा अहवाल स्वीकारण्याचेही आवाहन सरकारला केले. तसेच आंदोलकांना मारहाण झाल्यास मुंबईसह महाराष्ट्र ठप्प करण्याचा इशारा त्यांनी दिला.