
Maratha Reservation: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आरक्षणासाठी मोर्चेबांधणी करीत आहेत. ७ तारखेला मुंबईमध्ये मराठ्यांचं वादळ निर्माण होण्याची शक्यता असून जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. धाराशिवमागर्गे ते रवाना झाले आहेत. जरांगे पाटलांनी फडणवीसांना थेट इशारा दिला असून काही कमी-जास्त झालं तर मोदींनाही त्याची किंमत मोजावी लागणार आहे, असं ते म्हणाले.