
Jarange on Bhujbal: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली. पण त्यांच्या शपथविधीवर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे हे चांगलेच भडकले आहेत. अजित पवार हे जातीयवादी लोकांना पाठिंबा देत आहेत, असा गंभीर आरोप करत त्यांना हे महागात पडेल असा इशाराही दिला आहे. तसंच दुसरीकडं भुजबळांचं हे मंत्रीपद तात्पुरतं असेल त्यांना एक प्रकारे चॉकलेट दाखवलंय, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.