
मुंबई : आझाद मैदानावर मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाची आज विजयी सांगता झाली. मनोज जरांगे यांनी त्यांचे बेमुदत उपोषण मागे घेतल्यानंतर मुंबईसह राज्यभरामध्ये जल्लोष करण्यात आला. आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांचा विजय असो, पाटील, पाटील, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.