Maratha Reservation
Maratha Reservation Sakal

Maratha Reservation : मागण्या मान्य, उपोषण मागे; हैदराबाद, सातारा गॅझेटची अंमलबजावणी होणार; आंदोलकांचा जल्लोष

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणाची आज सरकारसोबत सकारात्मक वाटाघाटीनंतर शांततामय सांगता झाली असून राज्यभरात जल्लोष साजरा करण्यात आला.
Published on

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या प्रमुख मागण्या राज्य सरकारकडून मंजूर करवून घेत मुंबईत भगवा झेंडा फडकवला. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्यात असलेले अडथळे दूर करण्यासाठी हैदराबाद आणि सातारा गॅझेट (तत्त्वतः: मान्य) लागू करण्यास राज्य सरकारने आज मंजुरी दिली. यानंतर मागील पाच दिवस मुंबईतील आझाद मैदानात ठिय्या मांडून बसलेल्या जरांगे यांनी उपोषण सोडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com