मुंबईः आरक्षणाच्या मागणीवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे हे २७ ऑगस्ट रोजी मुंबईकडे कूच करणार आहेत. येत्या २९ ऑगस्ट रोजी त्यांनी मुंबईत धडकण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक बाबींवर शिफारशी करण्यासाठी स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे पुनर्गठन केले आहे.