Maratha reservation
esakal
मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय न झाल्याने मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. अंतरवाली सराटी येथे मराठा बांधवांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी मुंबईतील आंदोलनाबाबत महत्त्वाची माहिती दिली. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुंबईला जाणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी १५ सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.