
Maratha Reservation
Sakal
छत्रपती संभाजीनगर : ‘‘मंत्री छगन भुजबळ हैदराबाद गॅझेटला विरोध करत आहेत, परंतु ओबीसी आरक्षणात घुसखोरी केलेल्यांना आता बाहेर काढायची वेळ आली आहे. सरकारने १९९४ च्या ‘जीआर’नुसार ही कारवाई करावी. आमच्या हक्काच्या नोंदी असताना आरक्षणापासून कसे रोखता? १६ टक्के आरक्षणाचा जीआर कोणत्या आधारावर काढला होता,’’ असा परखड सवाल मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी भुजबळ यांना उद्देशून रविवारी केला. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.