Manoj Jarange: 'लोणावळा करार' निर्णायक ठरणार का? दोन सरकारी शिष्टमंडळं जरांगेंच्या भेटीला

Will the 'Lonavala Agreement' be decisive? जरांगेंच्या मागण्यांबाबत चर्चेसाठी पुन्हा एकदा शिष्टमंडळ लोणावळ्यात दाखल झालं आहे.
Eknath Shinde and Manoj Jarange Patil
Eknath Shinde and Manoj Jarange Patil esakal

नवी दिल्ली : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंची लढाई निर्णयक ठरण्याची शक्यता बोलली जात आहे. त्यासाठी सरकारची दोन शिष्टमंडळं त्यांच्या भेटीसाठी लोणावळ्यात दाखल झाली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील जरांगेंशी ऑनलाईन संवाद साधतील असं सुत्रांकडून कळतं आहे. (maratha reservation manoj jarange will lonavala agreement be decisive two govt delegations comes to visits)

"सरकारच्यावतीनं शिष्टमंडळ इथं चर्चेसाठी आलं आहे. पण मी आधी लोकांशी चर्चा करणार नंतर शिष्टमंडळाशी चर्चा करणार. दोन शिष्टमंडळं आली आहेत एक जुनं आणि एक नवं. जुनं शिष्टमंडळ म्हणजे विभागीय आयुक्तही भेटीसाठी आले आहेत. पण आधी मी मराठा समाजाशी चर्चा करतो, तोपर्यंत सर्व गाड्यांची तोंडं मुंबईकडं करुन ठेवायला सांगतो" असं जरांगेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. ( Maratha Aarakshan)

जर शिष्टमंडळाकडं समाजाचं हित असेल, आमच्या मागण्या आम्ही म्हणू तशा असतील तर बघू नसल्या तर मुंबईला जाऊ. अद्याप शिष्टमंडळाशी माझी कसलीही चर्चा झालेली नाही. आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम असून पुढे तर आम्ही जाणारच आहोत, असंही जरांगे यावेळी म्हणाले. (Government delegations to be held lonavala agreement meet with Jarange-Patil for Maratha reservation)

२६ तारखेला मराठा समाज मुंबईकड येणार. मी आधीच सांगितलं होतं, मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठा समाज असणार आहे. आम्हाला फक्त आरक्षण मिळालं पाहिजे ते कुठंही दिलं तरी चालेल. मग लोणावळ्यात, नवी मुंबईत किंवा आझाद मैदानात दिलं तरी चालेल, असंही यावेळी मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. ( Maratha reservation rally towards Mumbai )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com