

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. मनोज जरांगे यांचे तीन दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू आहे. मात्र गेल्या वर्षी झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात जरांगे यांची प्रत्येक मागणी हातावर उचलून धरणारे तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यंदा मात्र जरांगे लाखो मराठ्यांसह मुंबईत असूनही आज सातारा जिल्ह्यातील दरे या आपल्या गावी होते. त्यांनी आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.