
Manoj Jarange patil: मराठा आरक्षणासाठी आझाद मैदनात मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरु आहे. आंदोलनाचा शुक्रवारचा पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी मुंबईत मराठा आंदोलकांची तारांबळ झाली. कारण खाऊ गल्ल्या बंद होत्या, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बंद करण्यात आलेली होती, टॉयलेट्सला टाळे ठोकलेले होते. त्यामुळे सायंकाळी मनोज जरांगे पाटलांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला होता.