Maratha Reservation: ‘‘सत्ताधाऱ्यांना पाडण्यासाठी सुपारी घेऊन आंदोलन करता का?; नरेंद्र पाटलांचा थेट सवाल!

Narendra Patil: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे एक लाख मराठा उद्योजक संकल्पपूर्ती जिल्हास्तरीय मेळाव्यात ते बोलले
Maratha Reservation:  ‘‘सत्ताधाऱ्यांना पाडण्यासाठी सुपारी घेऊन आंदोलन करता का?; नरेंद्र पाटलांचा थेट सवाल!
Maratha Reservation: ‘‘सत्ताधाऱ्यांना पाडण्यासाठी सुपारी घेऊन आंदोलन करता का?; नरेंद्र पाटलांचा थेट सवाल!sakal
Updated on

सकाळ वृत्तसेवा

Latest Kolhapur News: ‘‘सत्ताधाऱ्यांना पाडण्यासाठी सुपारी घेऊन आंदोलन करता का? मराठा आरक्षणाचे आंदोलन राजकारणाच्या दिशेला नेऊ नका. मराठा समाजाला लाभ मिळवून देणाऱ्यांबद्दल निंदा कशाला करता?,’’ असा प्रश्‍न अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी शनिवारी येथे उपस्थित केला.

आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना महायुतीचाच मुख्यमंत्री होईल, असे सूतोवाचही त्यांनी केले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे एक लाख मराठा उद्योजक संकल्पपूर्ती जिल्हास्तरीय मेळाव्यात ते म्हणाले, ‘‘मराठा समाजाचा वापर केवळ निवडणुकांपुरता करण्यात आला.

Maratha Reservation:  ‘‘सत्ताधाऱ्यांना पाडण्यासाठी सुपारी घेऊन आंदोलन करता का?; नरेंद्र पाटलांचा थेट सवाल!
Maratha Reservation: मराठा आरक्षणावर या तारखेला महत्वाची सुनावणी, कुणबी प्रमाणपत्रावर काय होणार निर्णय?

त्यांना देताना मात्र हात आकसण्याची भूमिका नेत्यांनी घेतली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मराठा समाज का दिसला नाही? राजकारणात मराठा समाज मोठ्या प्रमाणात असला तरी नोकरीत त्याचे स्थान कमी आहे. त्यामुळेच महामंडळाची फेररचना करुन मराठा समाजाचे हित साधण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

मात्र, त्याचवेळी मराठा नेते काय करत होते? आता तर महायुतीच्या संदर्भात आव्हानांची भाषा केली जात आहे. याच महायुतीने कमी वेळेत कुणबी नोंदी काढण्याचे काम केले आहे.’’

Maratha Reservation:  ‘‘सत्ताधाऱ्यांना पाडण्यासाठी सुपारी घेऊन आंदोलन करता का?; नरेंद्र पाटलांचा थेट सवाल!
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी 80 वर्षीय ज्येष्ठानं संपवलं जीवन! माजी नगरसेवक म्हणून केलंय काम

‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार चांगल्या योजना आणून समाजाचे भले करण्यात व्यस्त आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महामंडळाला कधी पैसे दिले नाहीत. उलट, महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली.’’

महायुतीच्या काळात महामंडळाची स्थापना झाली असून, महामंडळ म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण या संकल्पनेला तडा देण्याचे काम अण्णासाहेब पाटील महामंडळाने केले आहे. नरेंद्र पाटील यांनी महामंडळाला गती दिली असून, महायुतीचे सरकार लोकहिताचे निर्णय घेत आहे.

- धनंजय महाडीक, खासदार

Maratha Reservation:  ‘‘सत्ताधाऱ्यांना पाडण्यासाठी सुपारी घेऊन आंदोलन करता का?; नरेंद्र पाटलांचा थेट सवाल!
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी 80 वर्षी व्यक्तीने करमाळ्यात संपविले जीवन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com