

करमाळा (जि. सोलापूर) : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्रात आजवर अनेक तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. या आरक्षणाचा लढा मनोज जरांगे हे अत्यंत चिकाटीनं देत आहेत. अनेकांना आरक्षण मिळेल याची आशा आहे. त्यातच आता एका ८० वर्षीय वृद्ध व्यक्तीनं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचं वृत्त आहे.