
वडीगोद्री : ‘आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईहून परत येणार नाही’, असा निर्धार मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज व्यक्त केला. २९ ऑगस्टला मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चासंदर्भात अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे त्यांनी आज समाजबांधवांच्या राज्यस्तरीय बैठकीत ‘आता माघार नाही’चा पुनरुच्चार केला.