
Maratha Reservation: मराठवाड्यातल्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, यासाठी राज्य शासनाने २ सप्टेंबर २०२५ रोजी जीआर काढला. या शासन निर्णयानुसार कुणबी प्रमाणपत्राची मागणी करणाऱ्यांना अगदी सहजपणे प्रमाणपत्र मिळणार आहे. अर्जदाराच्या गावातील, नातेवाईकांतील कुणीकडेही कुणबी प्रमाणपत्र असेल आणि त्याने ते प्रतिज्ञापत्रावर तसं लिहून दिलं, की अर्जदाराला ओबीसीमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला.