
मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्रात आंदोलन पटले आहे. यापूर्वी २०१७ मध्ये झालेल्या आंदोलनाला एका सामाजिक संघटनेने दिलेल्या पाठिंब्याची चर्चा सर्वत्र होती. हा पाठिंबा मर्हत्ता कौमी इत्तेहाद या बलुचिस्तानातील बलोच मराठा समाजाच्या संघटनेने दिला होता. बलोच मराठा ही संघटना पाकिस्तानमधील बलुचिस्तानमधील आहे. असाच काहीसा प्रकार २०२० च्या टोकीयो ऑलिंपिकमध्ये निरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकल्यावर देखील घडला होता. त्यावेळी रोड मराठा समाजाची चांगलीच चर्चा झाली होती.