
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज शुक्रवारी सकाळपासून मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये उपोषण सुरु केलं आहे. आझाद मैदानाची क्षमता संपल्याने मुंबईत जिकडे-तिकडे भगवं वादळ दिसून येत आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये तर आंदोलकांनी ठेका धरत गदारोळ केला.