
मुंबई : देशाच्या संरक्षणासाठी हयात गेली; मात्र निवृत्तीनंतर शासकीय नोकरीवेळी जात पाहिली जाते. आरक्षणाशिवाय आम्हाला दुय्यम ठरवले जाते. देशासाठी लढलो तेव्हा कोणी जात विचारली नव्हती, मग नोकरीसाठी जात का अडथळा ठरते, असा संतप्त सवाल निवृत्त सैनिकांनी उपस्थित केला. मराठा आंदोलनाच्या लढाईत निवृत्त सैनिकदेखील मैदानात उतरले आहेत.