Maratha Reservation : लढाईत बहुजनांचा पाठिंबा; संभाजीराजेंनी मानले आभार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sambhajiraje

Maratha Reservation : लढाईत बहुजनांचा पाठिंबा; संभाजीराजेंनी मानले आभार

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे म्हणून खासदार संभाजीराजे (Sambhajiraje) हे मुंबईत (Mumbai) (ता.२६) पासून आझाद मैदानावर उपोषणास बसले होते. आज सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर संभाजीराजेंनी अखेर आपलं उपोषण मागे घेतले. या उपोषणात ज्यांनी-ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे आभार त्यांनी मानले.

यावेळी संभाजीराजे म्हणाले, सर्व मराठा संघटनांचे, उपस्थित-अनुपस्थित असलेले, मला सहकार्य करणारे,सगळ्या खासदारांचे, आता नाही तर २००५ पासून मला ज्यांनी लढायची ताकद दिली अशा सर्वांचे मी आभार मानतो. सर्वांच्या सहकार्यामुळेच मी मराठा आरक्षण लढा उभा करू शकलो.

हेही वाचा: मराठा समाजाच्या मागण्या मान्य; संभाजीराजेंचं घेतलं उपोषण मागे

पुढे ते म्हणाले, मी खासदार झाल्यावर अनेकांनी टीका केली.पण माझी खासदारकी मी जनतेच्या कल्याणासाठी केली आहे. या सगळ्यात मला सर्वांची मोलाची साथ मिळाली म्हणूनच आज मी सगळ्यांचे आभार मानणार आहे. मला दुसरं आभार व्यक्त कारायच आहे ते म्हणजे बहुजन समाजाचे. आपल्या या लढ्यात बहुजन समाजसुध्दा माझ्या पाठिशी ठाम उभा राहिला त्यांचेही आभार व्यक्त करतो.

Web Title: Maratha Reservation Sambhaji Raje Thanks Speech Thanks Speech

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..