Ved Mantra Controversy: आता मंदिरे ब्राह्मणमुक्त...संयोगीताराजे छत्रपतींच्या वादात मराठा सेवा संघाची उडी

संयोगीताराजे छत्रपतींच्या वादात मराठा सेवा संघाची उडी; केली मोठी मागणी
Ved Mantra Controversy
Ved Mantra Controversy

छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांना वेदोक्त मंत्रोच्चार करण्यास महतांनी विरोध केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यानंतर राज्यात नव्या वादाला सुरुवात झाली. अशातच आता या वादात मराठा सेवा संघाने उडी घेत मोठी मागणी केली आहे. (maratha seva sangh Purushottam Khedekar big demands on Ved Mantra Controversy)

नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या वंशज असलेल्या संयोगिताराजे भोसले यांच्यासोबत जो प्रकार घडला त्याचा निषेध मराठा सेवा संघाने केला आहे. अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी यावेळी.

आता मंदिरे ब्राह्मणमुक्त करण्याची वेळ आली आहे, ब्राह्मणांच्या ऐवजी मंदिरात बहुजन सामजातील मुला-मुलींची नियुक्ती करावी अशी मोठी मागणी केली आहे. खेडेकर यांच्या या वक्तव्यानं आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Ved Mantra Controversy
Vedokt Controversy : काय आहे वेदोक्त प्रकरण ? संयोगीताराजेच नाही तर खुद्द छत्रपती शाहू महाराजांना झालेला विरोध

नेमका काय आहे वाद?

नाशिकच्या काळाराम मंदिरातील महंतांनी दर्शनासाठी आलेल्या संयोगिताराजे यांच्यासमोर पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. पण कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशा मुळे मी ठामपणे विरोध केला अशी पोस्ट छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीता राजे छत्रपती यांनी केली आहे.

Ved Mantra Controversy
Sanyogeetaraje Chhatrapati : वेदोक्त मंत्रोच्चार करण्यास महतांचा विरोध, छत्रपती संभाजीराजेंच्या पत्नी संतापल्या, 'ती' पोस्ट व्हायरल

पूजेदरम्यान काळाराम मंदिरातील महंतांनी संयोगीताराजे यांना वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला होता. त्यावेळी संयोगिताराजे छत्रपती यांनी महंतांना खडे बोल सुनावत रामरक्षा म्हटली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com