Maratha Youth : मराठा युवकांनी उद्योजक व्हावे; नरेंद्र पाटील यांचे युवकांना आवाहन

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पुण्यात विविध सरकारी कर्ज योजनांची माहिती देण्यासाठी खास कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
Narendra Patil
Narendra Patilesakal

पुणे - राज्यातील मराठा समाजातील युवकांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून उद्योग उभारणीसाठी कर्ज घ्यावे आणि या कर्जाच्या माध्यमातून नवनवीन उद्योग सुरू करून उद्योजक व्हावे, असे आवाहन या महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी बुधवारी (ता.१५) येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना मराठा समाजातील युवकांना केले.

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पुण्यात विविध सरकारी कर्ज योजनांची माहिती देण्यासाठी खास कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस गुलाब गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब अमराळे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस नामदेव मानकर, जिल्हा उद्योग केंद्राच्या निरीक्षक शुभदा सुतार, महामंडळ समन्वयक संकेत लोहार, महिला अध्यक्ष श्रुतिका पाडळे, युवक अध्यक्ष युवराज दिसले, सुधा पाटील, भाग्यश्री बोरकर आदी उपस्थित होते.

नरेंद्र पाटील पुढे म्हणाले, ‘मराठा तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता प्रामाणिकपणे, सचोटीने व्यवसाय केल्यास उद्योग विश्वात मराठ्यांचे अस्तित्व निर्माण होईल. यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ विविध कर्ज योजनांद्वारे नव उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील.’

आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे नोकऱ्यांची संधी दिवसेंदिवस कमी होत आहे. शिवाय पुणे शहराच्या परिसरात सेवा उद्योगांसाठी पोषक वातावरण आहे. मराठा युवकांनी या संधीचा फायदा घेऊन महामंडळाच्या योजनेतून कर्ज घेऊन व्यवसायात उतरले पाहिजे, असे मत राजेंद्र कोंढरे यांनी यावेळी व्यक्त केले.

प्रास्ताविक गुलाब गायकवाड यांनी केले. नितीन साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले तर, अमर पवार यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com