परळीतले आंदोलन 30 नोव्हेंबर पर्यंत स्थगित

प्रा. प्रविण फुटके
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

परळी : येथे मागील 21 दिवसांपासून सुरु असलेले ठिय्या आंदोलन मंगळवारी (ता. 7)  न्यायालय आदेशाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आले. तत्पुर्वी आंदोलक व प्रशासनात चर्चा झाली.

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, मेगा भरती थांबवावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला मोठा निधी द्यावा यासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी परळीत ता. 18 जुलै रोजी राज्यातला पहिला मराठा क्रांती ठोक मोर्चा निघाला. यानंतर सुरु झालेले ठिय्या आंदोलन एकवीस दिवसांपासून सुरु आहे.

दरम्यान, परळीतल्या आंदोलनामुळे राज्यात मराठा आरक्षण मागणी आंदोलनाचे दुसरे पर्व सुरु झाले. आंदोलनाला हिंसक वळण आणि या मागणीसाठी समाजातील युवकांनी बलीदान देण्याच्या घटनाही घडल्या. परळीतले आंदोलन मागे घेण्यासाठी प्रशासनाने आतापर्यंत केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीत न्यायालयाने आंदोलनाबाबत व्यक्त केलेल्या मतावरुन मंगळवारी परळीतील आंदोलक आणि प्रशासनात चर्चा झाली.

यावरुन आंदेालन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्या. समाजाच्या मागण्यांबाबत प्रशासनाने दिलेले लेखी आश्वासनांची ता. 15 नोव्हेंबर पर्यंत पुर्तता केली नाही तर पुन्हा याच ठिकाणी ठिय्या आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान, आंदोलन सुरु ठेवावे असे काहींचे मत लक्षात घेता त्यांना परिस्थिती आणि शासन व न्यायालय आदेशाबाबत समजून सांगण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MarathaKrantiMorcha parali maratha agitation has adjourned till 30th November