मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचा उच्चांक, दिवसाला 3 मृत्यू, कृषीमंत्र्यांच्या बीडमध्ये परिस्थिती गंभीर

Marathwada Farmer Suicide News
Marathwada Farmer Suicide News

Marathwada Farmer Suicide News

औरंगाबाद- मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचा दुर्दैवी उच्चांक पाहायला मिळत आहे. आठ महिन्यांमध्ये ६८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. दिवसाला तीन शेतकरी जीवन संपवत आहेत. धक्कादायक म्हणजे सर्वाधिक शेतकरी मृत्यू कृषीमंत्री धनंजय मुंढे यांच्या बीड जिल्ह्यामध्ये झाल्या आहेत.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा धक्कादायक आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ९५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जालन्यामध्ये ५० शेतकऱ्यांनी जीवन संपवलंय, तर परभणीमध्ये ५८ शेतकऱ्यांनी जीव दिलाय. हिंगोलीत २२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

Marathwada Farmer Suicide News
बीज अंकुरेना! मराठवाडा विदर्भात अजूनही पावसाची प्रतीक्षा

कृषीमंत्री धनंजय मुंढे यांच्या बीड जिल्ह्यात परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचं चित्र आहे. कारण एकट्या बीड जिल्ह्यात १८६ शेतकऱ्यांनी आठ महिन्यांत आत्महत्या केल्या आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये ५१ शेतकऱ्यांनी जीवन संपवलंय. नांदेडमध्ये ११० तर धारशीवमध्ये ११३ शेतकऱ्यांनी कंटाळून आत्महत्या केली आहे.

मराठवाड्यात शेती करणं दिवसेंदिवस कठीण होत जातंय. कधी अतिवृष्टी होते, कधी पाऊसच पडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला काहीही लागत नाही. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे. त्यांचे जीवन पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. पण, शेतीने दगा दिला तर त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा मार्ग राहत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी हताश होतोय.

Marathwada Farmer Suicide News
Maharashtra Politics : मंत्रिमंडळात मराठवाडा : सत्तार, सावेंच्या खातेबदलाने साधले शुद्धीकरण!

मराठवाड्यात यावर्षी पावसाने ओढ दिली आहे. दुबार पेरणी करुनही पीक हाताला आलेलं नाही. शेतकऱ्यांसमोर आता सरकारचा आधार राहिला आहे. पण, सरकारने याकडे दुर्लक्ष केलं तर शेतकरी हतबल होतो. अशा परिस्थितीत त्याला टोकाचं पाऊल उचलावं लागतंय असं बोललं जातंय. त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने पाहावं अशी मागणी होत आहे. (Latest Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com